Pune : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी प्रदीप पवार

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (AmiteshKumar) यांनी मंगळवारी (२ जून) रात्री काढलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाची धुरा आता प्रदीप पवार (PradeepPawar) यांच्या हाती देण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ११ पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात हा बदल विशेष लक्षवेधी ठरला आहे.(RajendraPanhale)

प्रदीप पवार यांनी यापूर्वी लष्कर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहताना कठोर शिस्त, धाडसी कारवाया आणि गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक भूमिका यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.(LoniKalbhorPoliceStation) त्यांच्या नेतृत्वाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि कायदा-सुव्यवस्था यंत्रणेतील जाणकार व्यक्त करत आहेत. (PuneCityPolice) सुरुवातीच्या आदेशात त्यांची नियुक्ती पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशी नमूद झाली होती; मात्र नंतर दुरुस्ती करून त्यांची नियुक्ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे अशी स्पष्ट करण्यात आली.(PoliceTransfers)

दरम्यान, राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळताना गुन्हेगारीविरोधात अनेक प्रभावी मोहिमा राबवल्या. (SeniorPoliceInspector) सराईत गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार यांसारख्या कठोर कारवाया करणे, गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करणे आणि चोरी–घरफोडीतील मुद्देमाल जप्त करून मूळ मालकांच्या स्वाधीन करणे अशी त्यांच्या कार्यकाळातील कामगिरी विशेष ठरली. कायद्याची अंमलबजावणी करताना घेतलेली कणखर भूमिका आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न यामुळे पन्हाळे यांनी या भागात वेगळी छाप पाडली.(CrimeControlDrive)

त्यांच्या बदलीमुळे नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका बाजूला त्यांच्या कारवाईक्षम शैलीची दखल घेतली जात असताना, दुसऱ्या बाजूला नव्या नियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. आता प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याची कामकाज शैली कशी असेल आणि गुन्हेगारीवर कितपत प्रभावी नियंत्रण आणले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(PuneNews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *