पुणे -प्रतिनिधी
पुणे पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . Pune Police
निलेश भाऊसाहेब पाटील असे आत्महत्या केलेल्या psi चे नाव आहे . सध्या त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलीस Vishrantwadi Police ठाण्यात होती .
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ,पुण्यातील औंध Aundh परिसरात राहत्या घरी असताना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल . गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या बद्दल पोलिसाना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत आढळलेल्या निलेश पाटील यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
निलेश पाटील Nilesh Patil यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. कौटुंबिक, वैयक्तिक अथवा कामाशी संबंधित तणावाची शक्यता लक्षात घेऊन पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून आवश्यक पुरावे ताब्यात घेतले आहेत.
या प्रकरणात पाटील यांच्या कुटुंबीयांसह सहकारी आणि संबंधित व्यक्तींकडे चौकशी सुरू आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल.
