पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील नसरांपूर येथील घटना ताजी असतानाच ,पर्वती पोलिस ठाण्याच्या (ParvatiIncident) हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(PuneCrime) या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. संतप्त नागरिकांनी आरोपीला तात्काळ आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.(JusticeForVictim) परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.(ChildSafety)
मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या घटनेनंतर महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
