Pune Crime : अल्पवयीन मुलांचं कांड; एकावर गोळीबार करून दहशतीसाठी हवेत गोळीबार

पुणे – प्रतिनिधी

सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अल्पवयीन टोळक्याने १७ वर्षीय मुलावर पिस्तूलातून गोळीबार करून दहशत माजवली.(Pune Crime ) मांडीत गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, (Minor Gang )पाचही आरोपींना बुधवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.(Shooting)

मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास चरवडवस्ती मैदानावर जखमी मुलगा मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना पाच अल्पवयीन आरोपींनी रोखले.(Sinhagad Road) शिवीगाळ करत लोखंडी हत्याराने वार केल्यानंतर एकाने पिस्तूल काढून मांडीवर गोळी झाडली.(Gang War )जखमी कोसळताच टोळक्याने हवेत गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.(Juvenile Crime)

वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटणकर,(Pune GangWar) उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करून आरोपींना पकडले. (Chrawadwasti Shooting)वडगाव बुद्रुक परिसरातील दोन गटांमधील जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे चौकशीत समोर आले. जखमीवर तीन गुन्हे नोंद आहेत तर आरोपींवरही पूर्वीचे गुन्हे आहेत.

पोलिस पिस्तूलाचा उगम व टोळक्यांचे नेटवर्क उघडण्यासाठी तपास करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच्या वादाचा हा बदला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.(MaharashtraCrime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *