पुणे -प्रतिनिधी
वाघोली पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बनावट कॉलच्या बहाण्याने आयटी अभियंता तरुण-तरुणीला धमकावून १० हजार रुपये उकळले. (Wagholi Police )परिमंडळ सातचे उपायुक्त सोमय मुंडे यांनी हवालदार किरण अब्दागिरे,(Police Suspension ) शिपाई गणेश खाडे व शिपाई किरण कांबळे यांचे तात्काळ निलंबन केले.(IT Professionals)
२ एप्रिल रात्री साडे अकरा वाजता डायल ११२ ला वाघोली सोसायटीत संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. खाडे व कांबळे हे घटनास्थळी गेले व २४ वर्षीय तरुणाला ठाण्यात नेले. अंमलदार अब्दागिरे यांनी सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करतो, नोकरी घालवतो अशा धमक्या देत पैसे मागितले.(Police Extortion)
खाडे याने तरुणाला चापट मारली तर कांबळे याने त्याच्या (Pune Crime) मैत्रिणीला ताटकळत उभे केले. शेवटी ओंकार ॲटो गॅरेज नावाच्या मोबाईल स्कॅनरवर १० हजार ट्रान्सफर झाले. तक्रारदाराने संशय घेत चौकशी केली तेव्हा हा सापळा असल्याचे उघड झाले.(Corrup tCops )
तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात गुन्हा सिद्ध झाल्याने निलंबनाचे आदेश जारी झाले. पोलिस दलात खळबळ उडाली असून पुढील चौकशी सुरू आहे.
