पुणे -प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे. भाजप नेते बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यातील वाद आता ‘फाईल वॉर’च्या पातळीवर पोहोचला आहे.भाजप नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना ‘मला फाईल उघडायला लावू नका, ताकदीची भाषा करू नका, गावोगावी भांडण लावू नका’ असा स्पष्ट इशारा दिला होता. या वक्तव्यामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, शेळकेंनीही हा इशारा स्वीकारला नाही. त्याऐवजी त्यांनी तितक्याच आक्रमक पवित्रा घेतला.शेळकेंचं ठाम प्रत्युत्तरशेळके म्हणाले, “ज्या ठिकाणी माझ्यावर आरोप करण्यात आले, तिथेच मी जाऊन पुराव्यानिशी उत्तर देईन. माझ्या सभेला अद्याप दोन दिवस बाकी आहेत, तोपर्यंत कितीही फाईली तयार करता येतील तेवढ्या तयार करा. मी बोलल्यानंतरच त्या उघडा.” पुरावे घेऊन सर्व खुलासा करणार असल्याचं सांगत शेळकेंनी या ‘फाईल वॉर’ला नवं वळण दिलं आहे.नेमकं प्रकरण काय?मावळमधील जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीत हे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भेगडे यांचा इशारा आणि शेळकेंचं प्रत्युत्तर यामुळे दोन दिवसांत मोठा राजकीय स्फोट होईल का, याकडे मावळवासीयांचं लक्ष लागलं आहे.
(politics)