पुणे -प्रतीनिधी
देहूगाव परिसरात जमिनीच्या खरेदीवरून झालेल्या वादातून तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची धारदार हत्याराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपी पतीने स्वतःवर ब्लेडने वार करून आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत महिलेचे नाव शुभांगी आकाश बारसकर Shubhangi Baraskar (वय २८) असे आहे. आरोपी पती आकाश रामदास बारसकर Akash Baraskar (वय ३१) हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील वाघा गावचा रहिवासी असून, हिंजवडीतील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान देहूगाव येथील एका भाड्याच्या खोलीत घडली. आकाश आणि शुभांगी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जमिनीच्या खरेदीवरून वाद सुरू होता. आकाशने काही महिन्यांपूर्वी मूळ गावी शेतीची जमीन खरेदी केली होती. मात्र, गावात जमीन घेण्याऐवजी पुण्यात घर अथवा मालमत्ता खरेदी करावी, अशी शुभांगी यांची इच्छा असल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.Pune Crime News
घटनेच्या दिवशी पहाटेही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आकाशने धारदार हत्याराने शुभांगी यांच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या शुभांगी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Crime Against Women
त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आकाशने स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार केले आणि दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.
इमारतीखाली आकाश जखमी अवस्थेत आढळल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना कळवले. देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, धारदार हत्यार जप्त केले आणि शुभांगी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शुभांगी यांचे वडील सतीश मारुती काईत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश बारसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Murder Case हत्या_प्रकरण आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली.
या घटनेमुळे देहूगाव आणि हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून, गर्भवती महिलेच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
