Dive Ghat Closed : मंगळवार दुपारी दिवेघाट पूर्ण बंद; हडपसर-सासवड प्रवासासाठी पर्यायी मार्ग पाहा

पुणे -प्रतिनिधी

पुणे-सासवड रस्त्यावरील दिवेघाटात रस्ता रुंदीकरणासाठी मंगळवार (१७ फेब्रुवारी २०२६) दुपारी ब्लास्टिंग होणार आहे. सुरक्षिततेसाठी सकाळी ११ ते दुपारी २ या ३ तासांत हडपसर-दिवेघाट दरम्यान सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहील.आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामांतर्गत हे युद्धपातळीवर सुरू असलेले काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होते आहे.(Dive Ghat Closed)

अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या कोंडी व अपघात टाळण्यासाठी हा फोर लेन मार्ग प्रशस्त होत आहे. ब्लास्टिंगदरम्यान दगड-ढिगारे कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक बंदीचा निर्णय घेण्यात आला.पर्यायी मार्ग: हडपसर-सासवडसाठी (Hadpsar Saswad) बोपदेव घाट (Dive Ghat Closed) किंवा हडपसर-लोणी काळभोर-उरुळी कांचन-जेजुरी मार्ग वापरा.प्रवाशांसाठी सूचना: सकाळी ११ आधी किंवा दुपारी ३ नंतर प्रवास नियोजा. दुपारी २ नंतरही वाहतूक संथ राहू शकते. वाहतूक शाखेकडून (TRaffic Branch) सहकार्याचे आवाहन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *