Sp Sandip Gil : शिवनेरीवर चेंगराचेंगरी नाही … काय म्हणाले SP संदीप गिल ; व्हिडिओ च्या माध्यमातून दिली माहिती

पुणे -प्रतिनिधी

 

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर  (Shivneri) शिवभक्तांची मोठी गर्दी असताना चेंगराचेंगरी झाल्याच्या चर्चांना पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंग गिल्ल ( Sp Sandip Gil ) यांनी फेटाळले. बुधवारी (१८ फेब्रुवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास भाविकांच्या जथ्याने शिवज्योत घेऊन गडावर दाखल होताना मीना दरवाजाजवळ पाय घसरून तिघेजण किरकोळ जखमी झाले, पण कोणतीही गंभीर दुर्घटना घडली नाही.(Shiv Jayanti)

 

अंबरखान्याच्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या अरुंद मार्गांवर गर्दी उसळल्याने ढकलाढकली झाली असून, काही महिला व लहान मुलांसह जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. आधीपासून तैनात पोलीस बंदोबस्ताने नियंत्रण राखले असून, घटनेनंतर अतिरिक्त खबरदारी घेतली. शिवभक्तांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देताना धावाधाव टाळा आणि शिस्त पाळा, असे आवाहन पोलिसांनी (Pune Police )केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *