पुणे -प्रतीनिधी
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २४ फेब्रुवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असून, गुणवत्ता निरीक्षक, प्रशिक्षणार्थी, गोदाम सहकारी, ऑपरेटर, ट्रान्सफॉर्मर वाइंडर, पॅनल वायरिंग, असेंब्ली फिटरसह विविध पदांसाठी एकूण १५५० जागा उपलब्ध आहेत .
दहावी, बारावी, पदवीधर व आयटीआय उमेदवारांसाठी ही संधी असून, इच्छुकांनी ऑफलाइन पद्धतीने उपस्थित राहून नोकरीसाठी मुलाखती द्याव्यात. रेझ्यूमे, शैक्षणिक प्रमाणपत्रे व फोटोसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, नोकरीचे ठिकाण पुणे शहर व परिसर असेल .
त्वरित नोंदणी व तयारी करावी, असे आवाहन जिल्हा रोजगार कार्यालयाकडून करण्यात आले आहे
