पुणे -प्रतीनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब पूर्व परीक्षा २०२६ साठी सुरुवातीला ८७ जागा जाहीर केल्या असून, उमेदवारांकडून ३१ मेपूर्वी ४८४ जागांची वाढ करण्याची मागणी तीव्र झाली आहे .(MPSC INformation)
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृषी विभागाच्या ४८४ मागणीपत्राला वित्त विभागाची तातडीने मान्यता देण्याची विनंती केली आहे .(Information News)
या वाढीशिवाय सलग तिसऱ्या वर्षी उमेदवारांच्या वयोमर्यादेचे व शैक्षणिक नुकसान होईल, असा इशारा देण्यात आला असून, राज्यसेवा (७९), पशुवैद्यकीय अधिकारी (८) यांसारख्या पदांसाठी ३१ डिसेंबर ते २० जानेवारी अर्ज प्रक्रिया झाली (Education Related News)
. पूर्वी २०२५ मध्ये ३८५ वरून ६०१ जागा वाढल्याप्रमाणे यंदाही शासनाच्या मागणीपत्रानुसार बदल शक्य असल्याचे आयोगाने नमूद केले आहे
