पुणे – प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (Sharad Pawar )पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने उपचारांनंतर चार दिवसांत घरी सोडले गेले होते, मात्र आज अस्वस्थता वाढल्याने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पवार यांना अशक्तपणा जाणवत असून, खबरदारी म्हणून सलाईन सुरू करण्यात आले आहे.(Ruby Hospital)
डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत असून, काही तपासण्या केल्या जाणार आहेत.दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली की, बाबांना पुन्हा रुबी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा जाणवत आहे. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे(Sharad Pawar Health )
