पुणे -प्रतिनिधी
जाधववाडी (पिंपरी-चिंचवड) येथे जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून एका तरुणावर पिस्तूलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१४ सप्टेंबर) पहाटे घडली. (Pimpri Chinchwad)
ओलियो हॉटेलजवळ पहाटे सव्वादोनच्या सुमारास रवी धनाजी घोगरे (३५) आले असता, स्वप्नील कांताराम जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे यांच्याशी त्यांचा वाद झाला. (Pune News)
वादाचे रूपांतर बाचाबाचीत होऊन स्वप्नील जाधव याने घोगरे यांना धमकी देत पिस्तूलातून गोळी झाडल्याचा आरोप आहे.Shooting Incident
गोळीबारात रवी घोगरे गंभीर जखमी झाले; नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Attempt To Murder)
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तपासाला वेग दिला; घोगरे यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील जाधव आणि रोशन पिंगळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, वाहन आणि मोबाईल फोन जप्त केला आहे.
या घटनेमुळे जाधववाडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे करीत आहेत.
