पुणे – प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरात डोळे येण्याच्या (कंजंक्टिव्हायटिस) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. हा स्पर्शजन्य आजार वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाने शाळा आणि पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये या संसर्गाचे प्रमाण जास्त आढळत आहे . (Pimpri CHichwad )आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांचा लालसरपणा, खाज, पाणी भरणे ही मुख्य लक्षणे आहेत. संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार धुवावेत, डोळ्यांना स्पर्श करू नये आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शाळांमध्ये रुग्ण आढळल्यास त्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .(Pune News )
या साथीला प्रतिबंधित करण्यासाठी स्वच्छता आणि वेळीच उपचार महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. शहरभरात जागरूकता मोहिम सुरू करण्यात आली असून, रुग्णालयांत विशेष व्यवस्था केली आहे .
