पुणे -प्रतिनिधी
मांजरी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील खूनाच्या गुन्ह्यात तो खून नसून, अपघाती मृत्यू झाल्याचे सत्य समोर आले आहे .(MundhwaInvestigation) काही दिवसांपुर्वी मुंढव्यातील केशवनगर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पोलिसानी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरवात केली . पोलिसांनी सलग ३ दिवस तपास केला असता (KeshavnagarCase) मृताची ओळख पटली दरम्यान तब्बल ७० सीसीटीव्ही तपासले असता ती हत्या नसून, डंपरने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे सत्य समोर आले आहे .(TippannaRathod)
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव तिपन्ना पत्त्याप्पा राठोड (वय ४१, रा. म्हसोबावस्ती, मांजरी) असे आहे आहे. (AccidentalDeath)पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरात केशवनगर येथे मोकळ्या जागेत तीन दिवसांपूर्वी मृतदेह मिळून आला होता . (DumperRunover) घटनास्थळाच्या प्राथमिक तपासणीवरून मृतदेहाच्या डोक्याला लागलेल्या गंभीर दुखापतीमुळे पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला होता. पण यात मयताची ओळख पटलेली नव्हती . पोलिसानी घटनास्थळ आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.
ओळख पटविण्याचे काम सुरू असताना तो तिप्पन्ना राठोड असल्याचे समोर आले .(ManjariArea) त्याच्या बद्दल मिळालेल्या माहितीनुसार त्याला दारूचे व्यसनही समजले .
.त्यानंतर पोलिसांनी तो ज्यांच्यासोबत दारू पित असे त्या मित्रांचा शोध घेतला. घटनेच्या दिवशी रात्री ते ज्या ठिकाणी दारू पित होते त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तिप्पन्ना हा पायी चालताना दिसला ,(PuneCrime) तसेच त्याच वेळी राडारोडा टाकणारा एक डंपरही त्या भागातून जात असल्याचे आढळले. सुमारे ७० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तिप्पन्ना हा घटनास्थळी रस्त्यालगत झोपल्याचे दिसून आले .(MundhwaPolice) त्याचदरम्यान डंपरची हालचाल संशयास्पद दिसली. पुढील तपासात डंपर चालकाने राडारोडा टाकताना वाहन मागे घेताना झोपलेल्या तिप्पन्ना यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी संबंधित डंपर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने अपघात घडल्याची कबुली दिली. मुंढवा पोलिसांनी सलग तीन दिवस यशस्वीरीत्या सखोल तपास केल्याने या प्रकरणाचे सत्य समोर आले आहे . सदरील कामगिरी पोलीस उपआयुक्त, अति. कार्या परीमंडळ . सागर कवडे, सहा. पोलीस आयुक्त . अतुलकुमार नवगिरे यांचे अधिपत्याखाली, मुंढवा पोलीस स्टेशन कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) . सागर गोडे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश पिगुवाले, संजय माळी, कल्पना सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, कविराज पाटील, सहा पोलीस फौजदार रोहीदास उगले, पोलीस हवालदार राहुल मोरे, शिवाजी धांडे, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, विशालदादा बनकर, रुपेश तोडेकर, सचिन बोराटे, पोलीस अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्निल रासकर, योगेश राऊत, सतिश कत्राळे याचे पथकाने तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय माळी करत आहेत
