पुणे -प्रतिनिधी
गेल्या वर्षापासून सुरू असलेल पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे , (PuneCrime) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला अद्यापही सुरू असल्याची चर्चा असतानाच, आता वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश मस्के याचा भाऊ बाळा मस्के (BalaMaske) याचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे (GangWar)
मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी भरदिवसा बुधवारी सकाळी पुण्यातील बालाजीनगर बसस्टॉपजवळ बाळा मस्केवर गोळीबार केला.(AndekarComkarConflict) त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याला जागेवरच संपवल ,या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे (StreetViolence)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी (PoliceInvestigation)धाव घेतली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मयत व्यक्तीचा भाऊ वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपी आहे . त्यामुळेच आंदेकर टोळीने याचा खून केला , असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. वनराजच्या खुनानंतर हा चौथा खून असल्याने आता पुणे पोलिसांवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय
