Pune : मेघा’ व्हिजन लॅबच्या अहवालातील चूकीने महिलेची कर्करोगाशी झुंज – लॅबविरोधात गुन्हा नोंद, तपास सुरू

पुणे- प्रतिनिधी

पुण्याच्या बंडगार्डन भागातील नामांकित रुग्णालयाजवळील मेघा व्हिजन लॅबच्या (MeghaVisionLab) निष्काळजीपणामुळे एक महिला कर्करोगाशी झुंज देत असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. लॅब तसेच रुग्णालयाच्या या निष्काळजीपणा महिलेच्या जिवावर बेतण्याची वेळ आल्याचे नातेवाईकांनी म्हंटले आहे. धक्कादायक म्हणजे, ९ लाख रुपये खर्च केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी याप्रकरणा लॅबविरोधात गुन्हा नोंदवला आहे.(PuneNews)
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस (KoregaonPark) ठाण्यात महिलेचे पती अजित तुरबे यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, मेघा व्हिजन लॅबविरुद्ध आणि संबंधित वैद्यकीय संस्थांवर बीएनएस कलम २०२६ १२५ अंतर्गत नोंद करण्यात आला आहे.(MedicalNegligence)

तक्रारानुसार, तुरबे यांच्या पत्नीच्या पोटात त्रास होऊ लागल्याने एप्रिल २०२५ मध्ये त्यांनी खराडी येथील मदरहूड हॉस्पिटल येथे सोनोग्राफी केली. त्यारिपोर्टच्या आधारावर ते डॉ. बंब नर्सिंग होम, रामवाडी येथे शस्त्रक्रिया करण्यास गेले. शस्त्रक्रिया पार पडली आणि मोठी गाठ काढण्यात आली. (HospitalAccountability) नंतर सदर गाठ मेघा व्हिजन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली. लॅबकडून मिळालेल्या अहवालात ती गाठ चरबीची व गर्भाशयाशी संबंधित असल्याचे म्हटले गेले. सॅम्पलही तक्रारदारांना सुपूर्त करण्यात आले.
परंतु ३ महिन्यांनी पत्नीला पुन्हा त्रास सुरू झाला.(CancerAwareness) मग, या दाम्पत्याने सोलापूरमधील दुसऱ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू केले. तेव्हा पुन्हा तपासणी केली. त्यात पुन्हा गाठ आल्याचे दिसून आले. पुन्हा त्यांनी तपासणी केली. तेव्हा ही गाठ कर्करोगाशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले. दाम्पत्याने जुन्या सॅम्पलच्या गाठ पुनःतपासणीसाठी दिली. त्यातली पहिली गाठही कर्करोगाशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले.(PatientsRights)

त्यामुळे सुरुवातीला मेघा व्हिजन लॅबने दिलेला अहवाल चुकीचा असल्याचे दिसून आले, असे तक्रारदारांनी म्हंटले आहे. तर यामुळे पत्नीला कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत असल्याचे व कुटुंबावर आर्थिक व मानसिक ताण आलेला आहे, असे तुरबे यांनी सांगितले.(JusticeForPatients)


विचारणा केली, पण दाद मिळाली नाही

तक्रारदार तुरबे यांनी डॉ. बंब नर्सिंग होम व मेघा लॅबकडे याबाबत विचारणा केली. पण, त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीकरून गुन्हा नोंदवला आहे. स्थानिक नागरिक आणि तक्रारदारांनी मेघा व्हिजन लॅबवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पुढील तपास कोरेगांव पार्क केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *