पुणे, शहर प्रतिनिधी-
शहरात भरदिवसा गोळीबार अन् खूनाचे प्रयत्न तसेच खूनाचा प्रयत्नाच्या घटना सुरू असताना हडपसर पोलिस (Hadapsar) ठाण्यापासून काही अंतारावरच एका तरुणावर टोळक्याने हल्ला केला. त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाणकरत त्याच्या डोक्यात दगड घातल्याचे समोर आले आहे.(HadapsarPolice) तो तरुण एटीएममधून पैसे काढून मित्रांसोबत बाहेर येत असताना भररस्त्यात ही घटना घडली. या घटनेनंतर एवढा माज येतो तरी कुठून ? असा सवाल उपस्थित होत आहे.(PuneNews)
याप्रकणी वैजनाथ भिसे (रा हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Assault) त्यानुसार ओम् वाडेकर, सार्थक वाडेकर, ओंकार जाधव, स्वप्नील धोत्रे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ ११८(१), ११५(२), ३५१(३) व ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.(AttemptedMurder)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिस ठाण्यापासून अवघ्या २०० मीटर वर व्हीआयपी गार्डन जवळ असलेले एटीएम मधून तक्रारदार व त्यांचे मित्र पैसे काढून बाहेर येत होते. (StreetViolence)यावेळी बाहेर तांबलेल्या आरोपींनी तक्रारदार तरुणाला अडवून त्याच्याशी वाद घातला. (SafetyForAll) तसेच, त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. नंतर एकाने डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. (JusticeNow) आरोपी ओम् वाडेकरने तक्रारदारां तोंड उचालून म्हणाला मला नीट बघ मी ओम् वाडेकर आहे. मीच तुला मारले आहे. अधिक तपास हडपसर पोलिस करीत आहेत .(#HadapsarCrime)
