पुणे -प्रतिनिधी
खाकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यातून समोर आली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका ३१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.(VictimDemandsJustice) एवढेच नाही तर पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर त्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या घटनेन संपूर्ण पोलीस दलात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.(FIRRegistered)
स्वदेश विजय चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे .(ArrestTheAccused)स्वदेश चव्हाण हा मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक (PSI) म्हणून अधिकृतपणे कार्यरत आहे.
गुन्हा दाखल होऊनही आरोपीवर अद्याप कोणतीही कडक कारवाई न झाल्याचा आरोप करत पीडित तरुणीने संबंधित आरोपी स्वदेश याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.(DelayInPoliceAction) पोलिसांकडून कारवाईला विलंब होत असल्याने ती प्रचंड संतापली आहे, असे समजते.(CheatingCase)
पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती जेव्हा जेव्हा स्वदेशकडे लग्नाबाबत विचारणा करायची, तेव्हा तो विषय टाळत असे.(LoveFraud) मार्च २०२६ मध्ये स्वदेशने तिला सरळ लग्नास नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे,(WomenSeekJustice) तसेच केवळ नोकरी मिळेपर्यंत आपला वापर केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित तरुणीने तात्काळ पुण्यात येत पोलिसांकडे धाव घेतली.
तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असला, तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिस कारवाईला जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करत तिने न्याय आणि आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे.(PuneNews)
