पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या (Wagholi) हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संबंधित मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली आहे.(WagholiPolice) या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरच्या महावीर सुदाम ससाने (वय २९, रा./ए/ओ साबळे, साईनाथनगर, पेरणे फाटा, तह. हवेली, जि. पुणे) यावर गुन्हा दाखल केला आहे.(PuneNews) या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या पाच तरुणींची सुटका केली आहे.
पुण्याच्या वाघोतील ९ सेन्सेस स्पा (9SensesSpa) स्पामध्ये बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.(MassageParlor) पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने आधी सापळा रचला, वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटवली आणि त्यानंतर मसाज सेंटरवर छापा टाकला, जिथे पोलिसांना मसाजच्या नावाखाली पाच महिलांचे शोषण होत असल्याचे आढळले.(SexRacket)
यावेळी पोलिसांनी स्पा मॅनेजरवर अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 3,4,5 आणि बीएनएसच्या कलम 143, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(HumanTrafficking)
ही उल्लेखनीय कामगिरी वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर श्रीअमितेश कुमारa(cpamiteshkumar), सह. पोलीस आयुक्त, संजय दराडे मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती, तेजस्वीनी सातपुते, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, गौहर हसन, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.-४, विजय कुंभार, पोलीस निरीक्षक छगन कापसे(Pichagagankapse) पोलीस अंमलदार भिवरकर, आंधळे, केदार, जाधव, रसाळ, कोंडे, म. पोलीस अंमलदार कंक, खेडेकर, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे .
