Pune Crime : कोरेगावपार्कमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! विदेशी तरुणीची सुटका ….

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील कोरेगावपार्कमध्ये गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे .तर केनिया (KenyanWomenRescued) देशातील चार तरुणीची सुटका केली आहे .(KoregaonParkRaid)या प्रकरणी एका आरोपीच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .(HighProfileSexRacket)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिमा स्टे सी येथील एका रूममध्ये विदेशी महिलांकडून देहविक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.(PuneCrimeBranch) या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने खातरजमा करून विशेष पथक तयार केले आणि रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान रूममध्ये चार विदेशी महिला आढळून आल्या. (AntiTraffickingAction) त्या सर्वजणी मिळून वेश्याव्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची सुटका करून एका आरोपीविरोधात अनैतिक मानवी वर्तन प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.(PuneCrimeNews)

या महिला कोणत्या देशातील आहेत, त्या कोणत्या कारणासाठी भारतात आल्या, त्यांचे वास्तव्य नेमके कुठे आहे, तसेच त्या व्हिसावर आल्या असतील तर कोणाच्या संपर्कात होत्या आणि त्यांना येथे आणणारा एजंट कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. (RescueOperation) या रॅकेटच्या मागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत. रात्री आठनंतर शहरात नाकाबंदी वाढवण्यात आली असून, (SexRacketBusted) मोकाट फिरणाऱ्या गुन्हेगारांवर यामुळे वचक बसावा, असा उद्देश आहे. तसेच रात्री दहानंतर हॉकर्स झोन आणि फुटपाथवरील दुकाने बंद करण्याची कारवाई सुरू आहे. या कारवायांच्या दरम्यानही गुन्हेगार सापडण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कडक पेट्रोलिंग राबवले जात आहे.(BreakingCrimeNews)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *