पुणे – प्रतिनिधी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू पिण्यामुळे (PoisonousLiquorTragedy) आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचाराधीन आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा, तर पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन असे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे यांनी बनवल्याचे समोर आले असून, (IllicitLiquor) ती दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांत विकली गेली.(PunePCMC)
दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ भागातील ज्यांनी ही दारू प्याली, त्यांना तोंडाला फेस आल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.(HoocheTragedy) योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता असून, त्याच्यावर आधी अनेक गुन्हे नोंदलेले आहेत. त्याला पोलीसांनी अटक केली असून, आणखी कोणाचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.(DeathsDueToAlcohol)
पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण परिसरात घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. (IllegalAlcoholRacket) याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.(PoliceAccountability)
गेल्या ४८ तासांत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, फुगेवाडीतील आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नावे:
अक्षय अवसरमल – वायसीएम रुग्णालयात मृत्यू
सौरभप्पा भंगारी – मेडीपॉईंट रुग्णालयात मृत्यू
भीमाप्पा बसवंत पुजारी – वायसीएम रुग्णालयात मृत्यू
परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.(PimpriChinchwadNews) अशा घटनांकडे दुर्लक्ष करणारे पिंपरी-चिंचवड पोलीस कधी जागे होणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
स्थानिक आणि लोकप्रतिनिधींकडून विषारी दारूचा उघड आरोप केला जात असताना, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मात्र वेगळा दावा केला आहे. ८ पैकी ५ नागरिकांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मृत पावलेल्या ८ पैकी ५ व्यक्तींना मृत्यूपूर्वी तीव्र चक्कर आली होती, अशी माहिती खुद्द पोलिसांनीच दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उर्वरित मृत नागरिक आणि सध्या उपचार सुरू असलेल्या व्यक्तींची प्रकृती नेमकी दारू प्यायल्याने बिघडली होती का? याचा तपास सध्या सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
एकाच दिवसात मृत पावलेले सर्व नागरिक एकाच परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला, की पोलीस म्हणत असल्याप्रमाणे अन्य कोणत्या आजाराने किंवा कारणाने झाला? हे अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवालाअंती स्पष्ट झालेले नाही. या संभ्रमामुळे फुगेवाडी परिसरातील नागरिकांची चिंता कमालीची वाढली आहे.
