Junnar Murder :बाबा लगीन.. लग्न न लावल्याचा राग अनावर , अन जुन्नरमध्ये मुलाने वडील आणि भावाला झोपेतच दगडाने ठेचून केले ठार

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील जुन्नरमधून रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर येत आहे .कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या लहान भावाची आणि वडिलांची झोपेत असताना च दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे (junnar Doubl eMurder)

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नातेसंबंधांतील तणाव किती टोकाला जाऊ शकतो, याची गंभीर जाणीव या प्रकरणातून होत आहे.

जयराम महादू मुकणे (Jayram Mahadu Mukhne) (वय ६०) आणि त्यांचा मुलगा राजेंद्र जयराम मुकणे (Rajendra Jayram Mukhne) (वय २७) अशी हत्या झालेल्या वडील आणि भाऊ यांची नावे आहेत . प्राथमिक तपासानुसार, जयराम यांचा दुसरा मुलगा बाबजी जयराम मुकणे याने दोघांवर दगडाने हल्ला ठेचून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, संशयित आरोपी बाबजी मुकणे (Babji Mukhne) याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वाद आणि मालमत्तेशी संबंधित काही आणि बाप लग्न लावून देत नाही या कारणांमुळे बाबजीच्या मनात होता. याच पैशांच्या आणि जमिनीच्या वादाने गुरुवारी रौद्ररूप धारण केले. नेहमीप्रमाणे होणाऱ्या भांडणाचे रूपांतर थेट खुनात झाले आणि रागाच्या भरात बाबजीने लाकडी चोपणीने मारहाण केली त्यानंतर डोक्यात दगड घालून वडील आणि भावाची हत्या केली.

वडील आणि भावाची हत्या केल्यानंतर आरोपी बाबजी मुकणे याने पुरावे नष्ट करून गावातून फरार होण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, घटनेची खबर मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या बाबजीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात (OturePoliceStation) त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता/भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

अटक केलेल्या बाबजी मुकणे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील सखोल तपास ओतूर पोलिसांकडून सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *