पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कॉर्पोरेट जगतात महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. (Pune Corporate Harassment)औंध येथील एका नामांकित विमा कंपनीत कार्यरत तरुणीला तिच्याच कार्यालयातील वरिष्ठ मॅनेजरने अश्लील प्रकारे त्रास दिल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहम्मद उर्फ जाफर सय्यद (Mohammed Alias JafarSyed) असे आहे. तो त्या विमा कंपनीत वरिष्ठ मॅनेजर म्हणून कार्यरत असून, आपल्या पदाचा गैरवापर करत तो संबंधित महिला कर्मचाऱ्याला वारंवार फोन करून कामाबाहेरील वेळेतही वैयक्तिक कारणांसाठी संपर्क करत असे.(Insurance Company Case) तो तिच्याशी खालच्या भाषेत बोलत अश्लील गप्पा मारून मानसिक छळ करीत असल्याचा आरोप आहे.(Workplace Harassment)
घटनेचा पुढचा टप्पा अधिक धक्कादायक होता. एका दिवशी जेवणासाठी बाहेर जाण्याचा बहाणा करून त्याने पीडित तरुणीला लोणावळा येथे नेले. तिथे तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Hinjewadi Police Station)या संपूर्ण त्रासाला कंटाळून आणि धीर एकवटून पीडित तरुणीने अखेर हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित मॅनेजर मोहम्मद उर्फ जाफर सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि त्याला अटक केली.(Women Safety AtWork) जबाबदारीच्या उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याकडून अशा प्रकारची घृणास्पद वर्तणूक झाल्याने पुण्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
