पुणे – प्रतिनिधी
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा (Malimala) परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Lonikand Police) ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव प्रियांका लक्ष्मण वाघमारे (वय २४) असे असून, तिच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.(Married Woman Suicide) नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पती लक्ष्मण वाघमारे हा दारूच्या नशेत प्रियांकाला वारंवार मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.(Haveli Taluka) त्यामुळे ही घटना केवळ आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.(Pune Rural)
शुक्रवारी सकाळी प्रियांका हिने घरातील खिडकीला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे चित्र नातेवाईक व शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले.(Domestic Violence) याची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पाहणी केली. त्यानंतर प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आला.(Violence Against Women)
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Crime News) प्रियांकाच्या मृत्यूमुळे लोणी काळभोर परिसरात हळहळ व्यक्त आहे
