पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) मद्यधुंद अवस्थेतील आरोपीने पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच अशा पद्धतीने हल्ला होणे चिंताजनक मानले जात आहे.(Pune Police)
एफआयआर क्रमांक ३२१/२०२६ मधील फिर्यादीनुसार, चौकशीदरम्यान संबंधित आरोपीने खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (PI Shasikant Chavhan ) आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की तसेच मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपीने मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या अंगावर थुंकून त्यांचा अवमान केल्याचे आणि शिवीगाळ व धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई चंद्रशेखर हुणचळगी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.(PuneCity) फिर्यादीनुसार, आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून अधिकृत कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण आणि कोयत्याने ठार मारण्याची धमक्या दिल्या. या प्रकारावरून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.(Drunk Accused)
