Pune Crime Court News : गांजा मिश्रित बंटा गोळी तस्करी प्रकरणात आरोपीला जामीन

पुणे -प्रतिनिधी

पुणे, जिल्ह्यातील चाकण (Chakan)भागात छाप्यात दिडशे किलो गांजा मिश्रित बंटा गोळ्यांची तस्करी प्रकरणात न्यायालयाने एका आरोपीला जामीन मंजूर केला. (Ganja Seizure) खेड-राजगुरूनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी हा आदेश दिला आहे.(Pune)
दिलीप कुंदवणी असे जामीन (Bail Granted) मिळालेल्याचे नाव आहे.

चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिन्या भरापूर्वी खेड तालुक्यात नाणेकरवाडी याठिकाणी पोलिसांनी राहुलसिंग लोधीच्या निवासस्थानी छापा टाकला होता. तेव्हा १४९ किलो ७१५ ग्रॅम वजनाच्या अंमली गोळ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. तपासात राहुलसिंग (Rahul Singh Lodhi) हा अंमली पदार्थ अर्जदाराला विकणार होता या माहितीवरून पोलिसांनी दिलीप याला अटक केली.(DilipKundvani)

सदर प्रकरणी अर्जदार यांनी अॅड. प्रसाद विराज निकम(Adv Prasad Nikam) व अॅड. मन्सूर तांबोळी (Adv Mansoor Tamboli) यांच्यामार्फत जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. अॅड. प्रसाद निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, जप्त केलेला सर्व अंमली पदार्थ सहआरोपी राहुलसिंग लोदी याच्या ताब्यातून मिळाला आहे. मुख्य आरोप त्याच्यावर आहेत. आरोपी कुंदवाणी यांच्याकडून कोणतीही वसुली किंवा जप्ती झालेली नाही. (Court Order)आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि तपास जवळपास पूर्ण झाला आहे. चार्जशीट अद्याप दाखल झालेले नाही व खटला लवकर निकाली निघण्याची शक्यता नाही. (Khed Rajgurunagar)न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण ऐकल्यानंतर
आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला(Police Raids)

सदर प्रकरणी अॅड. निकम यांना अॅड. शिवानी वाघमारे, अॅड. रोहित ढोते व अॅड. पृथ्वीजित माने यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *