Pune : पुणे कौटुंबिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : एकाच दिवशी परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर

पुणे, :

पुणे कौटुंबिक न्यायालयाने (Family Court)परस्पर संमतीने घटस्फोटाच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय देत सहा महिन्यांचा अनिवार्य ‘कूलिंग ऑफ’ कालावधी माफ करून अर्जदार दाम्पत्यास एकाच दिवशी घटस्फोट (Divorce)मंजूर केला. प्रमुख न्यायाधीश श्याम रुकमे यांनी आदेश दिला आहे.

सदर प्रकरणात पती-पत्नी दीर्घकाळापासून विभक्त राहत होते व त्यांच्यात पुनर्मिलनाची कोणतीही शक्यता नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आले. याप्रकरणी कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अर्जदारांच्या वतीने ॲड. भक्ती अंदे (Adv Bhakti Ande) व ॲड. विपुल अंदे (Adv Vipul Ande) यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्णयांमध्ये निर्धारित केलेली तत्त्वे तसेच प्रकरणातील वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सहा महिन्यांचा कालावधी माफ करण्याची विनंती केली.
युक्तिवाद विचारात घेऊन पुणे कौटुंबिक न्यायालयाने कूलिंग ऑफ कालावधी माफ करण्यास मान्यता दिली व त्याच दिवशी परस्पर संमतीने (Mutual ConsentDivorce) घटस्फोट मंजूर केला.

कोट–

या निर्णयामुळे संबंधित पक्षांचा वेळ, खर्च आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, वैवाहिक नातेसंबंध पूर्णपणे संपुष्टात आलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. (Divorce Law)अशा निर्णयांमुळे न्यायदान प्रक्रिया अधिक परिणामकारक व नागरिकाभिमुख होत असल्याची भावना कायदे क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

— ॲड. भक्ती अंदे, ॲड. विपुल अंदे अधिवक्ता, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *