Pimpri Chinchwad Crime : माझा गुटखा का आणला नाही ? भावाचा पारा चढला अन मध्यरात्रीच बहिणीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड

पुणे -प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे . केवळ एका गुटख्याच्या पुडीवरून नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आली आहे . (Pimpri Chinchwad)माझा गुटखा का आणला नाहीस म्हणून बहिणीच्या मुलाला मारहाण करणाऱ्या मामा ला थांबवन एका बहिणीच्या जीवावर बेतल आहे .संतापलेल्या भावाने थेट बहिणीच्या डोक्यात धारदार कुऱ्हाड (Axe Attack)घालून तिच्यावर वार केले .

हि धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरातील मोरे वस्तीत १३ जूनच्या मध्यरात्री १२:३० च्या सुमारास घडली आहे .

जखमीची झालेल्या बहिणीचे नाव प्रियांका सचिन कदम (Priyanka sachin kadam )(वय ३५) असे आहे .

प्रियांका यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांचा भाऊ संतोष पांडुरंग कांबळे ( santosh kamble )(वय ४२) याने आपला भाचा रोहनला दुकानात गुटखा आणायला पाठवले. रोहन गुटखा न आणता परत आला, त्यावर संतोषने भाच्याचा मारहाण करायला सुरुवात केली.भाच्याला मारहाण होत असल्याचे पाहून प्रियांका यांनी हस्तक्षेप केला आणि भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला; त्यावेळी संतोषने घरातील कुऱ्हाड उचलून प्रियांकाच्या डोक्यावर वार केल्याने ती गंभीर जखमी केले . घरच्या सदस्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून येथे तिचे उपचार सुरू आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून, आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *