Pune Crime : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदवाक्याचा पोलिसालाच विसर ? चक्क कोंढव्यात निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी

पुणे -प्रतीनिधी

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे, मात्र याचा विसर पोलिसालाच (Police)पडलाय का?, असा प्रकार काही पुण्यातील कोंढव्यातून समोर आला आहे .एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने (एसीपी) आपल्याच सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ करत तिच्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा (Pune Crime News) गंभीर आरोप करण्यात आला आहे . याप्रकरणी पती, सासू आणि नणंदांकडूनही विवाहितेला मारहाण आणि छळ करण्यात आला असून, कोंढवा पोलिसांनी निवृत्त एसीपीसह कुटुंबातील तब्बल ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Domestic Abuse)

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडील मंत्रालयातील उपसचिव म्हणून देय सेवेतून निवृत्त झाले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये विक्रांत घाडगे (Vikrant Suresh Ghadge) याच्यासोबत साखरपुडा झाला आणि एप्रिल 2022मध्ये सासवड येथील लग्न पार पडले. लग्नानंतर काही दिवसांतच सासर्‍यांनी छळाची सुरुवात केली; पती विक्रांत यांनी बंधनकारकपणे पत्नीला घरात बंद ठेवले, तिची नोकरी सोडवण्यास भाग पाडले व तिची सोशल मीडिया खाती डिलीट करण्यास वळवले. सासूने तिची दागिने हाती घेतली व माहेरच्या माणसांचा सतत अपमान केला, असे फिर्यादीने सांगितले.(Police Account ability)
तसेच निवृत्त एसीपी सुरेश घाडगे,जे आपल्या पदाचा व आर्थिक बळाचा दाख दाखवत धमकावतात, त्यांनी अनेकदा “आम्ही कायदा विकत घेऊ शकतो” व “तुला जिवंत गाडून टाकू” अशी धमक्या दिल्या.

तसेच पतीचे इतर महिलांसोबतचे अनैतिक संबंध आहेत
व त्याने घरात परस्त्री आणून तिचा अपमान करण्याचेही आरोप केले आहेत.

८ मे 2026 रोजी सासरच्या मंडळींनी फिर्यादी आणि तिच्या भावाच्या नात्यावर संशय दाखवून त्यांना त्रास दिला. आपल्या जीवाला धोका असल्याने फिर्यादी माहेर निघून कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तिने तक्रार नोंदवली.

पोलीस नोंदीनुसार पती विक्रांत सुरेश घाडगे, सासरे सुरेश रामचंद्र घाडगे व सासू सुनंदा सुरेश घाडगे (Sunanda Suresh Ghadge) (सर्व पारगेनगर, डीएसके गार्डन इन्क्लेव, कोंढवा) आणि नणंद स्नेहल प्रवीण सर्जेराव (Snehal Praveen Sarjerao)व प्रविण सर्जेराव (अकोला) तसेच नणंद वैशाली विक्रम राऊत व विक्रम राऊत (अंधेरी, मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमालस हा प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *