पुणे -प्रतिनिधी
१५ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि बाचाबाची झाल्याचा राग मनात धरून , तुझी माफी मागायची आहे, स्वागत बारजवळ ये,’ असा फोन करून गोड बोलून बोलावले आणि एका तरुणाच्या डोळ्यावर बिअरची बाटली व धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना मांजरी परिसरात घडली आहे .(Manjri Attack Accused)
राज बालाजी ढवळे (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मांजरी पोलीस फिर्याद दाखल केली आहे
या प्रकरणी विशाल शिंदे (Vishal Shinde) आणि त्याचा “मामा” (Mama Accused)म्हणून ओळखला जाणारा साथीदार यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील स्वागत बारमध्ये बसले असताना तेथे विशाल शिंदे व सुमित बोबडे दारू पित होते. तेंव्हा त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद शिवीगाळ आणि बाचाबाची झाली होती. त्याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने हल्ला केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे .
“तुझी माफी मागायची आहे, स्वागत बारजवळ ये,” असे सांगून बोलवले आणि गाडी पार्क करत असतानाच विशाल शिंदे याने हातातील बिअरची बाटली त्यांच्या डाव्या डोळ्यावर जोरात फोडली. बाटलीचा वार झाल्यानंतर ढवळे यांनी डोळे झाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विशालने सोबतच्या व्यक्तीला, “मामा… हाच तो आहे!” असे म्हणत चिथावणी दिली. त्यानंतर त्या साथीदाराने हातातील अज्ञात वस्तूने ढवळे यांच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला, डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत .
