पुणे -प्रतिनिधी
राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यात मुलींवर किंवा महिलांवर होणारा बलात्कार, लैंगिक अत्याचार या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. त्याचदरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे पुण्यातील आंबेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे . आपल्या कडे शिकवणीसाठी येणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत अश्लील कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे (Ambegaon)
.
आरीफ सेयाद (Arif Seyad) असे त्या क्लास चालकांचे नाव आहे . पोलिसानी त्याला ताब्यात घेतले असून पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . (Pune News )
नेमक काय घडल ?
मुलगी अनेक वर्षांपासून त्या शिक्षकाकडे शिकण्यासाठी जात होती. शिक्षक असल्यामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत विद्यार्थिनीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला घडणाऱ्या काही गोष्टींकडे मुलीने दुर्लक्ष केले. शिक्षक असल्यामुळे असे वागणे जाणूनबुजून नसावे, असे तिला वाटत राहिले.(Sexual Assault)
काही काळानंतर हा प्रकार अधिक गंभीर होत गेल्याचे समोर आले. एका दिवशी शिकवणी उशिरा संपल्यामुळे मुलगी शिक्षकाच्या घरी थांबली होती. घरात इतर सदस्य उपस्थित असल्याने कोणताही धोका वाटला नाही. मात्र रात्री घडलेल्या एका प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली. त्यानंतर तिने संपूर्ण रात्र भीतीच्या वातावरणात जागून काढल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर मुलीच्या स्वभावात अचानक बदल दिसून आला. ती कमी बोलू लागली, शांत राहू लागली आणि घरातील सदस्यांपासूनही दूर राहू लागली. मुलीच्या मोठ्या बहिणीला तिच्या वागण्यात झालेला बदल जाणवला. तिने प्रेमाने विचारपूस केल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ही माहिती वडिलांपर्यंत पोहोचली.
मुलीच्या कुटुंबीयांनी संबंधित शिक्षकाला जाब विचारला. सुरुवातीच्या चर्चेदरम्यान त्याने आपली चूक मान्य केल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनाही मिळाली. संतप्त झालेल्या काही नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
