पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील बांधकाम कंत्राटदार तथा व्यावसायिक खलील रज्जुलाल शेख यांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह १० जणांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. (Suicide Case)
खलील शेख ( Khalil Sheikh ) यांच्या पत्नी सुलताना खलील शेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
View this post on Instagram
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चित्रीत केलेला व्हिडिओ आणि लिहिलेली सुसाईड नोट समोर (Video Evidence)आल्यानंतर या प्रकरणाने मोठे राजकीय आणि व्यावसायिक वळण घेतले आहे.(Swargate Police)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागेवर उत्कर्ष असोसिएट्स या कंपनीकडून इमारत बांधण्यात येत होती. यामध्ये खलील शेख यांच्यासोबत प्रतिभा धंगेकर, वर्षा शेडगे यांच्यासह पाच भागीदार होते. मात्र हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नव्हता, या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी याप्रकरणी तेव्हा भाजपर आरोप केले होते.
सिया अन चेतनचा फ्री सेक्स ग्रुप ? केतन अग्रवाल खून धक्कादायक खुलासे , हादरवणारे हॉटेल कांड…
या प्रकल्पातील पाचही भागीदार कर्ज भरु न शकल्याने शेख खलील यांनी आत्महत्या केल्याचा दावा, रवींद्र धंगेकर यांनी केला होता. मात्र खलील शेख यांनी व्हिडीओत दावा केला होता की, बाळा शेडगे आणि रवींद्र धंगेकर यांनी ५० लाख दिले नाहीत, त्यामुळे आत्महत्या करीत आहे.. यासह इतरांनीही फसवलं असल्याचं शेख व्हिडीओत म्हणाले होते.
