पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडच्या Pimpri Chinchwadदेहुगावात कौटुंबिक वादातून २६ वर्षीय आयटी इंजिनिअरने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची निर्घूण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे आणि त्यानंतर पतीनेही स्वतःला जखमी करून इमारतीच्या मजल्यावरून गॅलरीतून उडी मारली आहे .
ही घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी पावणे ६ वाजण्याच्या सुमारास ओमकार सोसायटी परिसरात घडली . पोलिसांना रस्त्यावर जखमी आकाश रामदास बारस्कर Akash Barskar(२६) आढळले ; त्याच वेळी दुसऱ्या मजल्यावरील खोलीत त्यांची पत्नी शुभांगी आकाश बारस्कर Shubhangi Barskar (२८) गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या.Dehu Gaon
डॉक्टरांनी शुभांगी यांना मृत घोषित केले. वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Domestic Dispute
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच घरगुती कारणांवरून वाद सुरू झाले आणि ते वाढत गेले. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय आहे; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.Murder Case
आकाश हे हिंजवडीतील एका कंपनीत आयटी इंजिनिअर होते, तर शुभांगी Shubhangi Barskar खासगी कंपनीत नोकरीला होत्या.
