पुणे : प्रतिनिधी
पोलीस वारंट
पाच वर्षांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुचेता टाकळीकर यांनी हा आदेश दिला.
अमोल माणिक पांढरे, अभिषेक दशरथ पवार, अजय नरसिंग गरड, लक्ष्मण ऊर्फ जबा गजरमल आणि युवराज ऊर्फ सई ऊर्फ सया अशोक हावळे अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.(Court Order)
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अंतिम निकालाकडे लक्ष लागले होते. मात्र, सत्र न्यायालयातील अंतिम सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने तपासातील त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती तसेच तांत्रिक बाबींवर उपस्थित केलेले आक्षेप न्यायालयाने विचारात घेतले. अंतिम सुनावणीवेळी बचाव पक्षाने आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये आवश्यक ती सुसंगती नसल्याचा युक्तिवाद केला. (Criminal Case) साक्षीदारांच्या साक्षींमधील त्रुटी आणि तपासातील विसंगतींमुळे आरोपींविरुद्धचा आरोप ठोसपणे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. फौजदारी खटल्यात संशयाचा फायदा आरोपीला मिळणे आवश्यक असल्याचा कायदेशीर मुद्दाही बचाव पक्षाने मांडला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद व उपलब्ध पुराव्यांचा विचार करून आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.(Pune Updates )
हि कायदेशीर लढाई या खटल्याचे संपूर्ण न्यायालयीन कामकाज अॅड. आनंद आरू यांनी पाहिले, तर अंतिम युक्तिवाद अॅड. संतोष भागवत यांनी केला. त्यांना अॅड. विष्णू सावंत, अॅड. संकेत साळुंखे, अॅड. मुस्कान, अॅड. साहिल इनामदार, अॅड. अभिजित वानखेडे, अॅड. वेदांत भागवत, अॅड. समृद्ध भागवत, अॅड. प्रतीक कालेकर आणि कपिल गायकवाड यांचे सहकार्य लाभले.
