पुणे – प्रतिनिधी
सिंहगड रस्त्यावरील नवले पुलाजवळ व्यावसायिकाला लुटण्याचा एक कोटी रुपयांचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी असलेले दोन पोलीस कर्मचारी फरार झाले होते. (Pune Crime) या प्रकरणी आरोपी पोलीस हवालदार प्रमिला शरद निकम आणि पोलीस नाईक अजितजब्बार इसुब मेस्त्री यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुरुषोत्तम चौधरी यांनी दोघांचाही अर्ज फेटाळून लावला. (Narhe Robbery Case)
प्रथमदर्शनी दोन्ही पोलीस आरोपींचा इतर संशयितांबरोबर समान उद्देश (common intention) दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दरोड्याच्या कटात थेट पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली होती.(Sinhagad Road)
हे पहा :23 वर्षांनी घेतला ‘ वडिलांचा हत्येचा बदला 28 वार करुन कात्रज बोगद्यात खेळ संपवला लेकाने … सिनेमाला लाजवेल अशी थरारक कहाणी
दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणी सरकारी पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून पुढील सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, स्वतःला पत्रकार सांगणाऱ्या आशिष तिवारीसह काही आरोपींना अटक करण्यात आली आहे; तर प्रमिला निकम, (Anticipatory Bail) अजित मेस्त्री यांच्यासह सहा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.(Police Suspension)
या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कटात सहभाग आढळल्याने पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
