पुणे -प्रतिनिधी
राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहिलेले आढळून असल्यास त्या वाहनांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना आदेश दिले आहे.(Police)
दरम्यान, पोलीस लिहिलेल्या खासगी गाड्यांची तपासणी होत नसल्याने अवैध वस्तूंच्या वाहतुकीसाठी अशा गाड्यांचा वापर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (Private Vehicle ) तसेच, खासगी दुचाकीसह चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ अशी पाटी आढळल्यास महाराष्ट्र मोटर वाहन नियम १९८९ आणि मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील खासगी गाड्यांवर ‘पोलीस’ लिहिण्याबाबत नाराजी व्यक्त करत कारवाईचे आदेश दिले आहेत.(Mumbai High Court)
पत्रात नेमके काय म्हटले आहे?
‘पोलीस’ अशी नावाची लाल पाटी लावलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांतून बरेचदा अवैध कामे व दहशत निर्माण करणाऱ्या घटना घडत असल्याने अशा पाट्यांवर निर्बंध घालावेत, अशी विनंती करणारे पत्र सखाराम कुलकर्णी यांनी २७ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना पाठवले होते.(Legal Action)
राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी किंवा ‘पोलीस’ लाल अक्षरात लिहून वाहन चालवत असतात. यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून याबाबत कारवाईचे निर्देश दिलेले आहेत.
हे हि पहा :
‘पोलीस’ पाटी असल्याने ती गाडी चेक केली जात नाही. तसेच, ‘पोलीस’ असे लिहिलेली गाडी चेक होत नसल्यामुळे भाडे तत्त्वावर अवैध वस्तूंची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे अशा खासगी वाहनांवर लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहलेल्या आणि ‘पोलीस’ अशी पाटी लावलेल्या वाहन चालकांवर निर्बंध घालावेत, अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
सर्व पोलीस अधीक्षकांना आदेश देऊन ‘पोलीस’ पाटी किंवा ‘पोलीस’ नाव दिसलेले वाहन आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कलम १३३ (६) महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ सह कलम १७७ मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
तरी सदर तक्रार अर्जाची मूळ प्रत पुढील उचित कारवाईकरीता आपल्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.
