पुणे -प्रतिनिधी
चित्रपटातील कल्पनेलाही लाजवेल अशी एक थरारक आणि सुन्न करणारी घटना पुण्यातील बारामतीत घडली आहे. 38 वर्षीय महिलेने आपल्या जिवंत पतीला आधी गुंगीचे औषध देऊन अर्धवट बेशुद्ध केले, त्यानंतर बॅटने मारहाण करत त्याला घरातच जिवंत पुरून समाधी देण्याचा प्राणघातक प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बारामतीत मोठी खळबळ उडाली आहे.(Baramati)
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रकाश कान्होबा जगताप (वय 71, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांची सून शर्मिला प्रविण जगताप (Sharmila Jagtap)(वय 38, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 109(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(Crime)
हे हि पहा :23 वर्षांनी घेतला ‘ वडिलांचा हत्येचा बदला 28 वार करुन कात्रज बोगद्यात खेळ संपवला लेकाने … सिनेमाला लाजवेल अशी थरारक कहाणी
नेमकं काय घडलं?
पतीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून त्याच्यावर बॅटने मारहाण केली आणि नंतर घरातील गॅलरीत विटा-सिमेंटचा चौकोनी कट्टा बांधून त्याला जिवंत पुरण्याचा धक्कादायक प्रयत्न एका महिलेने केल्याची घटना बारामती शहरात उघडकीस आली आहे. शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८) असे आरोपी पत्नीचे नाव असून, तिच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune District)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शर्मिलाने पती प्रवीण प्रकाश जगताप यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गुंगीचे औषध दिले.(Maharashtra) प्रवीण जगताप अर्धवट बेशुद्ध झाल्यानंतर शर्मिलाने त्यांना बॅटने जबर मारहाण केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने घरातील हॉलच्या गॅलरीत विटा-सिमेंटचा एक चौकोनी कट्टा बांधला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवीण जगताप यांना त्या कट्ट्यात झोपवून वरून कडप्पा फरशीने तो कट्टा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा भयानक प्रकार सुदैवाने वेळेत उघडकीस आल्याने प्रवीण जगताप यांचा जीव वाचला. याप्रकरणी प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. वडिलांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी पत्नी शर्मिला जगताप हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे घरातील गॅलरीतच जिवंत पुरण्याचा कट रचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
