पुणे -प्रतिनिधी
प्रेम हे आयुष्यात जितका आनंद आणत तितकच ते कधीतरी घातकही ठरू शकत . याचाच प्रत्यंय देणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड मधील हिजवडी परिसरात घडली . एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली, तर तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला . (Hinjewadi Murder)
हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री (५ ऑगस्ट) निकिता शिवाजी दनाने ही तरुणी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. तिने पीजी चालकाला सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली राहण्यासाठी उपलब्ध करून दिली.
हेपहा :
निकिताच्या खोलीतून आरडाओरडा बाहेरगुरुवारी दुपारी (६ ऑगस्ट) दिनेश महादेव झांबरेDinesh hambre हा पीजीमध्ये आला. त्याने सागरला भेटायचे असून निकिता ही माझी प्रेयसी असल्याचे सांगितले. सागर तिसऱ्या मजल्यावर असल्याचे समजताच दिनेश थेट तिसऱ्या मजल्यावर गेला. काही क्षणांतच तिसऱ्या मजल्यावरून आरडाओरड ऐकू येऊ लागला. पीजीमधील कर्मचारी आणि इतर रहिवासी धावत वर पोहोचले असता सागर गायकवाड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर दिनेश त्याच्यावर लोखंडी रॉडने वार करत होता. हल्ला थांबवण्याचा प्रयत्न होत असतानाच आरोपीने निकितालाही बेदम मारहाण केली.
प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अशी की, आरोपीने सागरवर लोखंडी रॉडने तब्बल १३ ते १४ वार केले; यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला. निकिता गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पळून जाणाऱ्या आरोपी दिनेश महादेव झांबरे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खून आणि हत्येचा प्रयत्न यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हत्येमागील इतर कारणांचा आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पोलीस सखोल तपास करत आहेत.
