पुणे -प्रतिनिधी
आईकडे दारुसाठी पैसे मागूनही न दिल्याने पुण्यातील भोर (Bhor) परिसरात राहणार्या एका तरुणाने आईला लोखंडी रॉड घेऊन आईच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले तिचा खून केला दारू पिण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, बेबी मालुसरे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर समीरने (Sameer Malusare) लोखंडी रॉडने आईच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने बेबी मालुसरे यांचा मृत्यू झाला.
मृतदेह घरात ठेवून घराला कुलूप
आईचा मृत्यू झाल्यानंतर समीरने मृतदेह घरातच ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर त्याने शेजाऱ्यांना आई गावाला गेल्याचे सांगितले. मात्र, काही वेळाने घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला.
हे पहा :
भोर पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा केला आणि समीर मालुसरे याला ताब्यात घेतले. दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरूनच हा हल्ला झाला का, तसेच घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे म्हाळवडी (Mhalawadi) परिसरात खळबळ उडाली आहे
