पुणे -प्रतिनीधी
हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमाच्या त्रिकोनातील हत्या ताजी असतानाच आता पुन्हा एका महिलेन आपल्या मित्रालाच दगडाने ठेचून त्याचा खून केल्याची घटना समोर येत आहे . (Hinjewadi Police)दरम्यान हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लागोपाठ ही दुसरी खुनाची घटना आहे , हनुमंत सोपान शितोळे याची यवंता भगवंत तिडके (Jayvanta Tidke) ( वय ५०, कासारसाई) हिने हत्या केली आहे . तर या प्रकरणी मयूर शितोळे (३०, कासारसाई) यांनी फिर्याद दिली आहे.(Pune Crime)
वादातून जोरदार भांडण , दगडाने ठेचून हत्या
मृत हनुमंत शितोळे (Hanumant Shitole) आणि आरोपी महिला हे दोघे कासारसाई येथे दारू पीत होते. दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या भांडणात हनुमंत यांनी आरोपीला मारहाण करून तिचा हात पिरगाळला. याचा राग आल्याने आरोपीने तेथे पडलेला दगड उचलून हनुमंत यांच्या डोक्यात व छातीत जोराने मारला. यात यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.(Kasarsai Murder)
पुण्यात जाताच निकीता शाळेपासूनच प्रेम विसरली,संतप्त बॉयफ्रेंड ने हिंजवडी गाठली, अन एक्सच्या नव्या पार्टनरचा हॉस्टेलमध्ये घुसून काढला काटा
प्रेम हे आयुष्यात जितका आनंद आणत तितकच ते कधीतरी घातकही ठरू शकत . याचाच प्रत्यंय देणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड मधील हिजवडी परिसरात घडली . एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेण्डच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली, तर तरुणीवरही जीवघेणा हल्ला केला . (Hinjewadi Murder)
हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री (५ ऑगस्ट) निकिता शिवाजी दनाने ही तरुणी एका महिन्यासाठी पीजीमध्ये राहण्यासाठी आली होती. तिने पीजी चालकाला सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सागरने तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली राहण्यासाठी उपलब्ध करून दिली.
