पुणे -प्रतिनिधी
आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी आई कुठल्याही संकंटाचा सामना केऊ शकते असा सर्वसाधारण समज आहे .मात्र पुण्यातील एक आई चक्क आपल्या पोटच्या लेकीचीच वैरीण बनली . ग्राहकांकडून पैसे घेऊन अल्पवयीन लेकीला देहव्यापारासाठी खोलीत पाठवलं असल्याचा प्रकार समोर आला .मात्र पोलिसांनी कारवाई करत मुलीची सुटका केली .(Pune News)
सहकारनगर पोलीस (Sahakarnagar Police) ठाण्याच्या परिसरातील शकुंतला अपार्टमेंटमधील एका सदनिकेत अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी नियोजनबद्ध सापळा रचून कारवाई केली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाला संबंधित ठिकाणी पाठवले. प्राथमिक पडताळणीनंतर पोलिसांच्या पथकाने ‘बी’ इमारतीतील सदनिकेवर छापा टाकला. कारवाईदरम्यान अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.
या प्रकरणात मुलीच्या आईनेच तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे.(Child Safety) पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे आणि वैशाली खेडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.(Pune Police)
