पुणे -प्रतिनिधी
कात्रज-कोंढवा Katraj Kondhwa रोडवर सातत्याने अपघात होत आहेत . पिसोळी Pisoli परिसरात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भरधाव ट्रॅक्टरने आठ वर्षीय मुलीला धडक दिली आणि ती ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांच्या चौकशीत चालकाकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नसल्याचे समोर आले आहे.
वर्षा अजय जगदेव (वय ८, सध्या रा. मासाळ चाळीजवळ, पिसोळी) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचे कुटुंब मूळचे गुजरातमधील सूरतचे रहिवासी असून, वडील अजय जगदेव (२७) मजुरी करतात. १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वर्षा होले वस्ती परिसरातून निघाली असताना हा अपघात झाला.Criminal Case
या प्रकरणी ट्रॅक्टर चालक गणेश शंकर दिवटे (रा. सद्गुरु बिल्डींग, पिसोळी) आणि ट्रॅक्टर मालक भाऊसाहेब बाजीराव मासाळ (४७, रा. मयूरी ऑप्टिमम सोसायटी, पिसोळी) यांच्याविरोधात काळेपडळ पोलिस Kalepadal Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद अजय संजय जगदेव यांनी दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार रासकर करत आहेत.
ससूनहून परतताना काळाचा घाला ; महामार्ग ओलांडताना सहाय्यक फौजदाराचा मृत्यू
