Screenshot
पुणे -प्रतिनिधी
कानून के हाथ लंबे होते हैं’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरवत पुणे पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे .सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून अडीच कोटी रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास करून फरार झालेल्या चोरट्याना (Jewellery Theft) मांजरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .आरोपी कासिम मोहसीन शेख (Kasim Mohsin Shaikh) (वय ४१, रा. कुंचा सेठ, दरीबा कलान, चांदणी चौक, दिल्ली) याच्याकडून १३ किलो ७९२ ग्रॅम असलेली अंदाजे ३१ लाख रुपयांची चांदीची दागिने हस्तगत करण्यात आली आहे.(AradhyaJ ewellers)
जुलै २०२६ मध्ये चोरट्यांनी सोसायटीतील रखवालदाराच्या खोलीतून सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानात प्रवेश केला होता. यावेळी दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने, रोकड असा एकूण २ कोटी ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीने नेल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १३ आरोपींचा समावेश आहे.
तांत्रिक विश्लेषणातून एका आरोपीची हालचाल दिल्लीतील चांदणी चौक परिसरात दिसून आली. यानंतर मांजरी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीत धाव घेतली आणि कासिम शेख याला अटक केली. आरोपी कासिम हा चोरट्यांचा नातेवाईक असून तो चांदणी चौक परिसरात दागिने घडविण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चोरीनंतर आरोपींपैकी एक दिल्लीत आला आणि कासिमला १३ किलो चांदीचे दागिने ठेवण्यास दिले, असा आरोप आहे. कासिमने ती चांदी एका व्यक्तीला विकल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याच्याकडून १३ किलो ७९२ ग्रॅमची ३१ लाख रुपये किंमतीची चांदी जप्त करण्यात आली.
या कारवाईत आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल व सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम ( PI Babasaheb Nikam), पोलीस निरीक्षक इरफान नदाफ ( PI Irfan Nadaf), पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole)पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, गणेश काकडे, प्रकाश बेरड, अशोक अंधारे, रवीकांत कचरे, चंद्रकांत रेजितवाड, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव, हिरवे, अश्पाक शेख, वैभव ओहोळ, अमोल जाधव यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत .
