पुणे -प्रतिनिधी
शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असताना ,पुणे शहरातील सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे .(SinhgadRoadMurder)अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे .(RupeshBhadirge)
खून झालेल्या व्यक्तीचे नाव रुपेश सुरेश भादिर्गे (वय ४१, रा. स्पंदन बिल्डिंग, नऱ्हे, पुणे) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवराज गेजगे (रा. रेणुका नगरी, वडगाव बुद्रुक, पुणे) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .(YuvrajGejge)
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, सदरील घटना रविवार, दिनांक १७ मे रोजी रात्री १०.०० च्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील विकास कृष्णा दांगट यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी मयताचे भाऊ निलेश सुरेश भादिर्गे (वय ३८, व्यवसाय- सलून, रा. वारजे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (VadgaonBudruk) त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .(IllicitAffairDispute)
आरोपी युवराज याच्या पत्नीचे आणि रुपेश भादिर्गे यांचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते.(NarheAreaCrime)
याच गोष्टीचा संशय आरोपी युवराज याच्या मनात होता. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रुपेश हे वडगाव परिसरातील विकास दांगट यांच्या घरासमोर आले असता, आरोपी युवराजने त्यांना गाठले. दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान हिंसेत झाले. (PuneCrime)आरोपीने स्वतःजवळील तीक्ष्ण आणि धारदार हत्याराने रुपेश यांच्यावर एकामागून एक सपासप वार केले. रुपेश यांच्या मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. गंभीर दुखापत झाल्यामुळे रुपेश यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी युवराज गेजगे घटनास्थळावरून पळून गेला आहे .
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहे ,दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे .
