पुणे -प्रतिनिधी
महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना , पुण्यात अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .(UruliKanchanCase) घरगुती वादातून पतीने स्वतःच्या पत्नीवर अमानुष (CruelHusband) अत्याचार करत तिच्या गुप्तांगावर ॲसिड (AcidAttack) टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे .या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे , आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी महिलेच्या पती विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे .(ViolenceAgainstWomen)
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महिलेचा पती हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतो . ” तुला दोन मुलीचं, मुलगा होत नाही,” या करणावरून पीडितेला मारहाण देखील करण्यात आली. या दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून या कारणांवरून वाद सुरू होते. या वादातूनच राग अनावर झालेल्या पतीने पत्नीवर अत्याचार करत तिच्यावर ॲसिड फेकल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे . या भीषण प्रकारात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या शरीराला मोठी इजा आहे.(DomesticAbuse)
महत्वाची बाब म्हणजे या कृत्यानंतर फिर्यादीच्या पतीने पत्नीला दवाखान्यात उपचारासाठी न घेऊन जाता १५ दिवस घरात कोंडून ठेवले . अखेर ९ मे रोजी पती कामावर गेल्यानंतर महिलेने दोन्ही मुलींना सोबत घेतले अन माहेर गाठले. माहेरी सर्व प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उरुळी कांचन पोलीस ठाणे (PunePolice) गाठत पोलिसांना सर्व प्रकार सांगितला , त्यानंतर , पोलिसांनी तात्काळ त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात (SassoonHospital) पाठवले, जिथे उपचार घेतल्यानंतर १५ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .(WomenSafety)
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुणे पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे .(PuneCrime) नेमके कारण काय, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अधिक तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहे .(StopViolence)
