Pune : व्हिडिओत लाचखोर पोलिस कैद; पुणे पोलिस दलात खळबळ! दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित पुणे पोलिस उपायुक्तांचा तात्काळ निर्णय

पुणे -प्रतिनिधी

पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांचे अवैध धंदे बंद करण्याचे सातत्यपूर्ण आदेश असताना, एका कर्मचाऱ्याला व्हिडिओत लाच घेताना पकडले गेले. यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी चौकशी करून दोन पोलिसांना तात्काळ निलंबित केले.

निलंबित करण्यात आलेले कर्मचारी हे सहकारनगर पोलिस (Sahakarnagar Police) ठाण्यातील तपास पथकातील सहाय्यक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड (Bapusaheb Khutwad)आणि पोलिस हवालदार अमोल प्रकाश पवार (Amol Pawar Suspended )आहेत. गेल्या महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमोल पवार अवैध धंदा चालवणाऱ्याकडून पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत होते.(Illegal BusinessExtortion)

या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली गेली असून, ‘शिस्तभंग आणि दलाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल’ ही कारवाई करण्यात आली. (Milind Mohite)नागरिकांमध्ये पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असून, शहरात जोरदार चर्चा सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *