पुणे -प्रतीनिधी
नवरा-बायकोच्या नात्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विश्वास. मात्र या विश्वासाला तडा गेला की, होत्याच नव्हतं होतं. परंतु, अनेकदा केवळ विश्वास तोडल्याच्या संशयाने देखील कुटुंबच्या कुटंब उध्वस्त होतात. अशीच काही बातमी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आली आहे . पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Character Suspicion)घेऊन पतीने पत्नीचा निर्घृण खून केला .आणि मग लरीतून पडली’चा बनाव रचणाऱ्या पतीला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .या घटनेन एकाच खळबळ उडाली आहे .(Bibwewadi Murder)
सारिका शुभम घोडके (२३)(Sarika Ghodke) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे , तर शुभम श्रीकांत घोडके (२९) (Shubham Ghodke )याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे .(Gallery FallCoverup)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती शुभम हा सतत सारिकाच्या चारीत्र्यावर संशय घेत असत याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला . (Pune Crime)शुभम ने सारिका ला बेदम मारहाण केली व धारदार हत्याराने तिच्यावर वार केले . यात ती गंभीर जखमी झाली .तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र डॉक्टरानी तिला मृत घोषित केले .(Marital Murder)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Domestic Violence)प्राथमिक पाहणीतच पोलिसांना संशय आला. आरोपीने ‘गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाला’ असा दावा केला असला, तरी घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
दरम्यान पळून जाण्याच्या तयारीत् असलेला पती शुभम घोडके याला पोलिसांनी अटक केली आहे . अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते यांनी दिली . (PI Ashwini Satpute)
तर चौकशीदरम्यान शुममने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Pune Police)त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले .अधिक तपास पोलीस करत आहेत .(Crime News)
