Pune Crime : घरच्यांनी प्रियसीच लग्न जमवलं , प्रियकराने घरात घुसून तिचा गळा चिरला , पुण्यातील ‘त्या’ तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली

पुणे -प्रतिनिधी

पुण्याच्या चंदननगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.एका प्रसिध्द मॉल मध्ये काम करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून तिला गंभीर केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती .(ChandanNagarMurder) आज २२ वर्षीय उजालादेवी जसवंतसिंग दोहरे(UjalaDeviDohare) हिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.(LoveAffairMurder)

प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे.(PuneCrime) दिलीप राठोड व उजालादेवी हे दोघेही पुण्यातील नामांकित मॉलमध्ये काम करत होते. कामाच्या ठिकाणी ओळखीतून मैत्री व प्रेमसंबंध झाले. (MallEmployee) मात्र उजालादेवी गावी गेली असता कुटुंबाने दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले.(MarriageDispute)

ही बातमी दिलीपला कळताच तो संतापला. २९ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता तो चंदननगर घरात घुसला. दोघांमध्ये वाद झाला आणि संतापात चाकूने गळा व शरीरावर वार केले. (PuneHorror) जखमी उजालादेवीने भाऊला व्हिडिओ कॉल केला.(ChandanNagarPolice )

घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी आरोपी दिलीप राठोडला तात्काळ अटक केली. परिसरात खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *