पुणे:प्रतिनिधी
बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बांधकाम वादातून एका नागरिकाला बाणेर पोलिस ठाण्याबाहेर धमकी दिली,(Pune Drama)असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पुढील कारवाई सुरू आहे.(Corporator Threat)
तक्रारदार सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, राहणार बाणेर) यांच्या राहत्या जागेवर चुलत भाऊंसोबत मालमत्तेचा वाद सुरू आहे.(Balewadi News) या वादग्रस्त जागेवर बांधकाम चालू असल्याने महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ (Baner Police)नोटीस जारी केली होती. तरीही बांधकाम थांबले नाही. याची तक्रार करण्यासाठी चाकणकर कुटुंबीयांसह बाणेर पोलिस ठाण्यात गेले.
दरम्यान, तेथे नगरसेवक बाबूराव चांदेरे आले.(NCP Drama) त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घातला आणि, “माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो. तू कसा जगतोस ते मी बघतो,” अशी धमकी दिली, असा आरोप तक्रारीत आहे.(Bamboo Threat) तसेच, चांदेरे यांनी आपल्या चालकाला “बांबू काढ” असे सांगत मारहाणीची धमकावली. या घटनेनंतर चाकणकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, तक्रार नोंदवली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.(Pune Crime)
